सांगवी गावातील जळालेल्या वृद्धेचा अखेर मृत्यू

यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द येथील एका 75 वर्षीय महिला घरात खाटेवर झोपली असतांना अंगावर पांघरलेल्या चादरने पेट घेतला होता. ही घटना 10 मार्च रोजी घडली होती व यात त्यांचे दोन्ही पाय जळाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी त्यांचे निधन झाले.

जानकाबाई हरचंद पाटील (75) असे मयताचे नाव आहे.

यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जानकाबाई या 10 मार्च रोजी घरात झोपल्या असताना खाटेजवळील शेकोटीमुळे त्यांनी पांघरलेल्या चादरने पेट घेतला व त्यात त्यांचे दोन्ही पाय भाजले गेले. त्यांना तातडीने तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला तर या प्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.निता भोळे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे.