सांगवी, दापोडीत बाबासाहेबांना अभिवादन

0

सांगवी : जुनी सांगवी, दापोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त विविध संस्था,सामाजिक संघटना यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. येथील रोहित राज युवा प्रतिष्ठानच्यावतीने नगरसेवक रोहित काटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समीर शेख, विक्की किंडरे, जावेद नदाफ उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने पुतळ्यास पुष्पहार करण्यात आला. यावेळी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अजय झुंबर, नंदू भुजंग, सचिन तोरणे आदी उपस्थित होते. भारीप बहुजन महासंघाच्या वतीने दापोडी विभाग चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुहास देशमुख, अमित सुरवसे, शिवराज कांबळे आदी उपस्थित होते. येथील विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा मंचाच्यावतीने मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजारी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी गोपाळ मोरे, शैलेश ओव्हाळ, सुनील कांबळे, इसताफ शेख, अमिन शेख आदी उपस्थित होते. सतिश हेल्थ अँड स्पोर्ट्स यांच्यावतीने अन्नदान व गरजूंना कपडे वाटप व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अखिल भारतीय रामोशी समाजाच्यावतीने अध्यक्ष दीपक माकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालिकेच्या ड क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे सौदागर आरोग्य कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचे प्रतिमेस आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, आरोग्य सहाय्यक दीपक माकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

जुनी सांगवी येथील मधुबन मित्र मंडळाच्यावतीने मधुबन सोसायटी येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पिं.चि.म.न.पा.च्या स्थायी अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. मधुबन मित्र मंडळाच्यावतीने त्यांचा संविधान प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, अंबरनाथ कांबळे, जवाहर ढोरे, हिरेन सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन गणेश ढोरे यांनी केले. तर आभार रविंद्र गायकवाड यांनी मानले.