सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात गलथान कारभार

0

शिरपूर । येथील पंचायत समिती सदस्यांची नुकतीच मासिक सभा घेण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य बालकिसन पावरा यांनी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गैरसोयीबद्दल प्रश्‍न उपस्थित केला. पावारा यांनी सांगवी आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी महिला आल्यास लगेच वीज पुरवठा बंद करून लाईट नसल्याचा बहाना करून शिरपूर येथे स्थलांतर केले जाते. रूग्ण जाताच लगेच काही क्षणात कशी काय लाईट येते असा संतप्त सवाल पावरा यांनी केला. आदिवासी भागात आरोग्य विभागाचे तीन तेरा वाजले आहेत, अधिकारी दांड्या मारतात, आरोग्य केंद्राच कुणीच सापडत नाही, असेही त्यांनी सांगितले. अशा अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

128 शिक्षकांची पदे रिक्त
गटविकास अधिकारी एम.डी. बागूल, सहाय्यक बीडीओ शरद कासार, डॉ. वाडीले, भरत कोळेकर आदी उपस्थित होते. कृषी अधिकारी भरत कोळेकर यांनी खरीप हंगामासाठी जिल्हास्तरीय पिकनिहाय बि-बियाणे व खतांचे नियोजनाची माहिती दिली. यात संकरीत कापसाचे 2 लाख 88 हजार पाकिटे, सोयाबीन 4031 क्विंटल, संकरीत ज्वारी 410, संकरीत मका 3300, संकरीत बाजरी 390 इतर पिके 1500 क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

तालुक्यातील सर्वच जि.प.शाळा डिजीटल
शैक्षणिक वर्ष संपत आले तरीसुद्धा या वर्षी उपशिक्षकांची 111, विषय शिक्षकांची 9 व पदोन्नती मुख्यध्यापक 8 अशी एकूण 128 पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले. तर तालुक्यातील सर्वच 264 जिप शाळा डिजीटल झाल्याचे सांगण्यात आले.