सांडपाणी, जलपर्णीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

ऑईल मिश्रीत सांडपाण्यामुळे जलचरांचा मृत्यु, शेतीवर विपरीत परिनाम

चिंबळी :– लाखो भाविकांचे श्रध्दा असलेल्या श्री क्षेत्र आळंदी, देहू या पुण्यभुमितून वाहत असललेल्या इंद्रायणी नदीवर चिंबळी मोशी हद्दीत शेतीच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने बंधारे बांधले आहेत. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या इद्रायंणी नदीत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील ऑइल मिश्रित साडपांणी सोडत असल्याने दुर्गंधी येते तसेच जलपर्णीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जलचर प्राण्यांचा मृत्यू
शेतीसाठी पाणी पुरवठा उपलब्ध होऊन या परिसरातील शेती बायागती व्हावी म्हणून मरकळ ते देहू पर्यंत इद्रायंणी नदीवर विविध ठिकाणी बंधारे बांधले आहेत. या बंधार्‍यांमध्ये दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच जलपर्णीची वाढ होण्यास सुरुवात होते. परिनामी डासांचे प्रमाण वाढून रोगराईचे वातावरण निर्माण होऊन हजारो जलचर प्राण्यांचे जिव जातात. तसेच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते व खरीप रब्बी हगांमातील पिकावर परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

नागरीकांमध्ये संताप
उन्हाची तिव्रता वाढली की पाण्याचा पातळीत घट होते त्यामुळे जलपर्णी खुजू लागते आणि दुर्गंधी मध्ये वाढ होण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात होते. त्यामुळे डासांचे प्रमाण पुन्हा वाढत जाते. चिंबळी मोशी हद्दीत असलेल्या इद्रायंणी नदीच्या बंधारावरून जातांना येताना येथील शेतकरी वर्गाना व विध्यार्थ्याना तसेच कामगार वर्गाना नाक धरून जावे लागत आहे. त्यामुळे नागरीक तीव्र संताप व्यक्त करत आहेत