मनोर । भावनादेवी भगवान सांबरे सीबीएसई स्कुल व ज्युनिअर कॉलेज झडपोली येथे प्रयोगशाळा उदघाटन सोहळा शिवाजीराव पाटील (अध्यक्ष माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य), रसिक मेरगु (सचिव मंत्रालय) इंद्रजित निंबाळकर (प्रसिध्द उद्योगपती), मनोज शहा (प्रसिध्द उद्योगपती), प्रकाश जयस्वाल (प्रसिध्द उद्योगपती), भगवान सांबरे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केले.
यूपीएससी, एमपीएसी परीक्षेचे मोफत प्रशिक्षण
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले इंद्रजित निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना निलेश सांबरे यांचे विशेष कौतुक केले, ठाणे-पालघर जिल्ह्यात सांबरे जे समाजकार्य करत आहे ते खरंच वाखणण्याजोगे आहे, त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेल्या मोफत यूपीएससी, एमपीएससी क्लास तसेच मोफत पोलीस भरती प्रशिक्षण, विविध तालुक्यांतील मोफत वाचनालये याचे कौतुक शिवाजी पाटील यांनी केली.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
तसेंच भावनादेवी भगवान सांबरे सीबीएसई स्कुल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण विद्यार्थ्यांंकडून करण्यात आले. यावेळी झडपोली व वाडा तालुक्यातील असंख्य पालकांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थिती नोंदवली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बक्षिसांची वर्षाव मोठ्या प्रमाणावर करून मनोबल वाढवून सहकार्य केले.