रावेर येथे लोकन्यायालयात 474 प्रकरणांचा निपटारा
रावेर (प्रतिनिधी)- दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले दावे वादी आणि प्रतिवादी यांनी सामंजस्य अंगीकारून मिटविल्यास आपापसातील संबंध कायम प्रेमाचे राहतात, असे विचार न्या.ए.एन.जयस्वाल यांनी रावेर लोकन्यायाच्या उद्घाटनप्रसंगी केले. वाद संपुष्टात आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए.एन.जयस्वाल होते. प्रमुख उपस्थित म्हणून सह दिवाणी न्या.आर.एल.राठोड यांच्यासह वकील संघाचे अध्यक्ष सुभाष धुंदले हे होते. लोकन्यायाधीश म्हणून दीपक नगरे, शक्ती सोहनी, स्वप्नील जोशी, दीपक गाढे आदी उपस्थित होते.
474 प्रकरणांचा निपटारा
प्रास्ताविकात गट विकास अधिकारी हबीब तडवी यांनी लोकन्यायालय आणि तालुका विधी सेवा समिती याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गजरे यांनी केले. रावेर येथील लोकन्यायालयात 5411 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली. त्यातील 474 प्रकरणे निकाली काढण्यात आले. दाखलपूर्व 411 प्रकरणांपैकी 85 प्रकरणे मिटली. कोर्टातील 209 प्रकरण पैकी 80 निकाली निघाली. दिवसभराच्या कामकाजामध्ये 17 लक्ष 33 हजार 807 रुपये वसूल करण्यात आले. लोक न्यायालय यशस्वीपणेपणे पार पाडण्यासाठी सहा.अधीक्षक पी.एस.गडे, एस.एस.कुलकर्णी, एस.के.नारखेडे, पी.एस.निंभोरे, ए.वाय.पठाण, के.आर.वाणी, एन.डी.कुलकर्णी, जे.एस.मानकर, एम.एस.सोनवणे, के.बी.जावळे, वाय.एस.वैद्य, पी.सी.चव्हाण, भूषण चौधरी, डी.बी.बडगे, एस.आर सावळे, भगवान चौधरी यांच्यासह सर्व ग्रामसेवक, नगरपालिका कर्मचारी, बँका प्रतिनिधी, दूरसंचार विभागाचे कर्मचार्यांंनी परीश्रम घेतले.