निगडी – नंदकिशोर कल्चरल सोसायटी आणि नेहरु युवा केंद्र क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि. 11 रोजी उत्तरपूर्व आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती डॉ. नंदकिशोर कपोते यांनी दिली. येथे रविवार दि. 11 मार्चला निगडी येथील नंदकिशोर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात आठ राज्यातील मिळून एकूण 275 कलाकार सहभागी होणार आहे. यात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, नागालॅण्ड, त्रिपुरा, मिझोराम, सिक्कीम या आठ राज्यांतील कलाकार नंदकिशोर कल्चरल सोसायटीमध्ये येणारआहे. या अगोदर डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांचे शिष्य कथक नृत्य सादर करणार आहेत.