सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळतो गुणांना वाव

0

भुसावळ : येथील गोपाल बालवाडीत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम 25 रोजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, राकेश कोल्हे, नगरसेविका प्रतिभा पाटील उपस्थित होत्या. प्रसंगी युवराज लोणारी यांनी, लहाणपणापासून विद्यार्थांना आपले सुप्त कलागुण सादर करण्याची संधी बालवाडीपासूनच मिळत आहे या मुळे त्यांचे नेतृत्व गुण वाढीस लागतात ही विद्यार्थ्यांसाठी गौरवाची बाबा असून यातूनच काही विद्यार्थी भविष्यात यश संपादन करून नावलौकिक मिळवू शकतात. आमच्या बालपणी अशा प्रकारच्या अद्यायावत बालवाड्या व शाळा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

वैश्‍विक मुल्यांची होते जपवणूक
प्रमुख अतिथी संदीप पाटील यांनी वैश्‍विक मुल्यांची जपवणूक होण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. कारण बालवयातील मुलांमध्ये एकमेकांप्रती समता, बंधुता, प्रेम व सहकार्‍याची भावना निर्माण होते. बालवाडीत होणार्‍या या सांस्कृतिक उपक्रमांमुळे शहराच्या वैभवात भर पडून असे उपक्रम राबविणे गरेजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. राकेश कोल्हे यांनी आपल्या मनोगतात, आजचे बालकांची बौद्धीक क्षमता पाहता अशा विविध उपक्रमातून त्यांचा शैक्षणिक व बाौद्धीक विकास होत असल्याचे समाधान व्यक्त करुन त्यानी बालकांचे कौतुक केले.

स्पर्धांचे बक्षिस वितरण
यावेळी बालकांच्या फॅन्सी ड्रेस, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या यानंतर वार्षिक बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन गोपाळ बालवाडीच्या संचालिका अंजली महाजन यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा कुलकर्णी यांनी तर यशस्वीतेसाठी दर्पणा कुलकर्णी, सुचिता पवार, पद्मीनी नाटकर, नलिनी कोळी, अंजली भाकरे, सविता जोशी, अभिमन्यू टेमकर, चंद्रकांत महाजन, संजय कुलकर्णी व नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.