सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

0

एरंडोल : यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे के.डी.पाटील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये 23 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील तसेच प्रमुख पाहुणे आनंदराव पाटील, कोकीळा पाटील, संजय पाटील, प्रा.डॉ.ए.आर.पाटील उपस्थित होते. सरस्वतीपूजन संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी केले. प्रा.दिनानाथ पाटील सरांनी शाळेचा वार्षिक अहवाल सांगितला. सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनमुराद आनंद लुटला त्यात गणपती स्तवन, फुलपाखरु, छम्म छम्म, इंडियन आर्मी आदींसह इतर अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी यांचा सहभाग
यानंतर नाटक विनोद यातही विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व दाखविले. इयत्ता सहावीचे विद्यार्थी निखिल पाटील, गिरीश पाटील, उबेद पिंजारी, रितेश पाटील यांनी उत्तम सुत्रसंचालन केले. सुत्रसंचालनात विद्यार्थ्यांना प्रा.एन.व्ही.दांडेकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.दिनानाथ पाटील, शेखर पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच निलप्रभा मेश्रामकर, पुष्पा पाटील, स्वाती पाटील, कविता चौधरी, प्रियंका मोराणकर, महेंद्र पाटील, राहुल सुर्यवंशी, गणेश पाटील, मनिषा देडेकर, रुपाली पाटील, किर्ती साळी, सुनिता पाटील, जितेंद्र पाटील. पंकज भाऊ, आशा, निशा यांनी सहकार्य केले.