साईजीवनच्या दालनामुळे वाढणार शहराचे सौंदर्य

0

भुसावळ। येथील अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठित लोकांच्या वस्तीत साईजीवन सुपरशॉपी व पारिवारीक वस्रदालन सुरु झाल्याने नागरिकांना एकाच छताखाली सर्व वस्तू मिळणार असुन शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांंनी सांगितले. ते यावल रस्त्यावरील साईजीवन सुपर शॉपी व पारिवारीक वस्रदालनाच्या व्दितीय शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

ग्राहकांना मिळणार रास्त दरात उत्कृष्ट साहित्य
यावेळी आमदार सावकारे म्हणाले की, शहरात मोठे उद्योग नसले तरी रेल्वे, आयुध निर्माणी व औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या जास्त असुन प्रतिष्ठित नागरिकांचीही संख्या कमी नाही. या भागातच बहूतांश लोकांचे वास्तव्य असून त्यांना या भागात अशाच रास्त दरात उत्कृष्ट साहित्य देणार्‍या दालनाची गरज होती ही गरज पुर्ण करण्यासह नगरसेवक पिंटू कोठारी यांंनी शहराच्या सौंदर्यात भर टाकल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान खाद्यपदार्थ व सौंदर्य प्रसाधने विभागाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे, पारिवारीक वस्रदालनाचे उद्घाटन रजनी सावकारे, ललिता अनिल चौधरी व संगिता बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रेमचंद कोटेचा, विनोद चोरडिया, गटनेता मुन्ना तेली, प्रा.सुनिल नेवे, पुरुषोत्तम नारखेडे, रमेश नागराणी, प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, रमेश मकासरे, गिरीष महाजन, किरण कोलते, मुख्याधिकारी बी.टी. बावीस्कर, विश्वनाथ अग्रवाल, राजेंद्र आवटे, महेंद्र अग्रवाल, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, जुबेर पठाण, कैलास उपाध्याय, असलम मेमन आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत रमेशचंद कोठारी, कंचनबाई निमाणी, रविंद्र निमाणी, अजित कोठारी, पिंटू कोठारी व पुजा कोठारी यांच्यासह कोठारी व निमाणी कुटूंबातील सदस्यांनी केले.