साईडपट्ट्यांचे काम नित्कृष्ठ

0

जळगाव। शहरातील नागरिकांच्या वाहनाच्या आणि जीवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गलगत असलेल्या साईडपट्ट्या व्यवस्थित भरल्या जाणे आवश्यक असताना अतिमहत्वाच्या कामाकडे शहराचे महापौर आणि विधानसभेचे आमदार भोळे , विधान परिषद आमदार पटेल,आणि जळगाव मतदार संघाचे खासदार पाटील यांनी लक्ष देण्याची लक्ष देण्याची गरज असल्याचे मत कृती समितीने व्यक्त केले आहे. याकरिता जळगाव शहर समांतर रस्ते कृती समितीतर्फे 10 मे पासून साईडपट्टी भरण्याच्या कामाची पाहणी व निरिक्षण करण्याला सुरुवात करण्यात आली आहे. महामार्गाबाबत नागरिकांची जागरुकता महत्त्वाची असून मुरुमाची गुणवत्ता कमी असल्याने काम दर्जाहिन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपघात कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा कृती समितीने केला आहे.यावेळी जळगाव समांतर रस्ते कृती समितीचे डॉ राधेशाम चौधरी,नगरसेवक अनंत जोशी,अमोल कोल्हे,फारूक शेख,विनोद देशमुख,गजानन मालपुरे,सलीम इनामदार,डॉ रागीब जहागीरदार,विराज कावडीया,अमित जगताप,मीर नाजीम अली आदींनी पाहणी केली.

साईडपट्यांची दर्जाहीन कामे
सहा महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जळगाव शहराच्या महामार्गलगतच्या साईडपट्ट्या भरण्याचे आश्वासन दिले होते. 15 दिवसांपूर्वी साईटपट्याच्या कामासाठी मुरुम टाकण्यात आला आहे. मुरुमाचा वापर साईडपट्ट्या भरण्या योग्य पध्दतीने झालं पाहिजे. मात्र कृती समितीने पाहणी केली. असता ईच्छादेवी परिसरात साईडपट्ट्या न भरता मुरुम पसरवून ट्रैक्टर ट्रॉलीच्या च्या माध्यमातून टायरने दबाई करण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे नागरिकांची आणि प्रशासनाची देखील दिशाभूल केली जात आहे. दर्जापूर्वक काम होण्यासाठी अधिकार्‍यानी लक्ष घालण्याची गरज आहे.
10 कोटी खर्च होणार : शासनाच्या वतीने साईटपट्याच्या तातडीच्या कामासाठी 10 कोटी रुपये खर्च होणार असून लोकप्रतिनिधीनी कामे योग्य होण्यासाठी पाहणी करण्याची गरज आहे. कोटी पर्यत साईटपट्याचे कामे दिले गेले आहे. यामध्ये किमान शहरालगतचीच कामे होणार आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षतेची दक्षता लक्षात घेवून पुढील कामे व्हावीत. यासाठी ठेकेदाराकडून योग्य कामे झाल्यास पुन्हा रस्त्यावर होणारे अपघात कमी होणार आहे. महामार्ग समतोल साईडपट्टी भरली जावी. रोडरोलर च्या सहाय्याने दबाई झाल्यास साईटपट्या भरल्या जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे
महार्गासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत असून कृती समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. समांतर रस्ते कृती समितीच्या सदस्यांनी महामार्गाची पाहणी करून माहिती घेतली आहे. याबाबत चर्चेत सहभागी होऊन प्रकरण आणि पुढील कार्यवाही समजून घेण्याची गरज आहे. या कामाविषयी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना आज दि.11 मे रोजी सकाळी 11:00 वाजता कृती समिती निवेदन देण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे दिले जाणार आहे.