साईबाबांच्या आशीर्वादाने पुन्हा मोदीच पंतप्रधान-फडणवीस

0

अहमदनगर – आज शिर्डीत साईबाबांचा समाधी शताब्दी सोहळा साजरा झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी ‘पंतप्रधान मोदींना साईबाबांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

साईबाबांचे भक्त जगभरात असल्याने शिर्डी हे आंतराष्ट्रीय धार्मिक स्थळ आहे, असेही फडणवीस म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते आज राज्यात अडीच लाख घरकुल वाटप करण्यात येणार आहे. तसेच अजून ६ लाख घरांची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकार २०२२ पर्यंतचा घरकुल संकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करेल, तसेच राज्यावर यंदा दुष्काळाचे सावट आहे. मात्र, या परिस्थितीत केंद्र सरकार हिमालयासारखे उभे राहून निश्चितच मदत करेल, असा विश्वास फडणवीस यांनी दर्शविला.

शहरातील फ्लाय ओव्हरसाठी राज्य सरकारकडून ५० कोटींचा अतिरिक्त निधी देण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, पंतप्रधानांनी गृहकुलाच्या प्रातिनिधिक स्वरुपात ५ लाभार्थ्यांना चावी आणि कलश देऊन घराचे हस्तांतरण केले.