साई अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश

0

महाराष्ट्र ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गाजवले वर्चस्व

पिंपरी-चिंचवड : येथील साई स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंनी बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मोठे यश संपादन केले आहे. यामध्ये त्यांनी दोन सुवर्ण, रौप्य तसेच कांस्य पदक मिळवले आहे. पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनने या स्पर्धेसाठी साई स्पोर्टस् अकॅडमीच्या 12 खेळाडूंची निवड केली होती. त्यामध्ये अंकिता कोंडे, श्वेता जायभाय, सोनल कांबळे, आरती सुतार, प्रांजल नवले, मेलविन थॉमस, मंगेश कदम, शिवम हिंगे, सार्थक सिंग, आदित्य खोत, अक्षय घोंगे, उद्धव रासकर यांचा समावेश होता. या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.

थॉमस व कदमला सुवर्ण पदक
मेलविन थॉमस याने गोळाफेक प्रकारामध्ये तर मंगेश कदम याने डेकॅथ लॉनमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच श्वेता जायभाय हिने हॅपटॅथ लॉनमध्ये आणि आरती सुतार हिने 100 मीटर अडथळा धावणे प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावले. सार्थक सिंग याने 100 मीटर धावणे प्रकारात आणि आदित्य खोतने उंच उडी प्रकारात कांस्य पदक मिळवले.

राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेत 14, 16, 18, 20 वयोगटातील राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत 100 मीटर धावणे, 100 मीटर अडथळा धावणे, 200 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हॅपटॅथ लॉन, डेकॅथ लॉन, बांबू उडी, उंच उडी, तीन किलोमीटर चालणे, 10 किलोमीटर चालणे अशा विविध प्रकारांचा समावेश होता.