साई कापडणे, वाजिदला मावळी मंडळ श्री किताब

0

ठाणे । मावळी मंडळ आयोजित ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत युनिव्हर्सल फिजीक सेंटरच्या वाजिद खानने केवळ दोन दिवसांच्या अंतराने दुसरे जिल्हास्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकताना मावळी मंडळ श्री किताब आपल्या नावे केला. या स्पर्धेच्या जोडीने घेण्यात आलेल्या मावळी मंडळ अंर्तगत शरीरसौष्ठव स्पर्धेत साई कापडणे विजेता ठरला. या स्पर्धेत अंर्तगत लढतीत 10 आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत 88 शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. सुजय जिमच्या राजेश लांजेकरची स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक म्हणून निवड करण्यात आली. व्ही एस वर्ल्ड फिटनेसचा सचिन चोरगे, युनिव्हर्सल फिजीक सेंटरचा अल्तमश मोमीन आणि स्फुर्ती व्यायामशाळेचा आशित महाले यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. युनिव्हर्सल फिजीक सेंटरने 18 गुण मिळवत सलग दुसरे सांघिक अजिंक्यपद मिळवले. तर 10 गुणांसह अपोलो जिम उपविजेते ठरले.

स्पर्धेचा गटनिहाय निकाल
गट पहिला : योगेश वायल ( लॉरेन्स हेल्थ क्लब), रुपेश पवार (मसल बिल्ड जिम्नॅशियम), परशुराम बुरोंडकर (अपोलो जिम). गट दुसरा : वाजिद खान (युनिव्हर्सल फिजीक सेंटर), करण ठाकूर (व्ही फिटनेस), निलेश दवणे (युनिव्हर्सल फिजीक सेंटर). गट तिसरा : भुषण भोईर (अपोलो जिम), राजेश लांजेकर (सुजय म्हात्रे), जितेश म्हात्रे (अपोलो जिम). गट चौथा : विलास पाटील (गेट फिट हेल्थ क्लब), अल्तमश मोमीन (युनिव्हर्सल फिजीक सेंटर), संजय विश्‍वकर्मा ( बळीराम मोकाशी व्यायामशाळा).
अंर्तगत स्पर्धा : गट पहिला : अमर इंदुलकर, स्वप्निल शिंदे, शुभम जामसुतकर. गट दुसरा : किशोर घाणे, मनिष पष्टे. गट तिसरा : साई कापडणे, विशाल उबाळे. गट चौथा : सौरभ आहेर, सतिश महाडीक, आकाश पवळे.