नागरिकांकडून समाधान व्यक्त
पिंपरी : जगताप डेअरी चौकामध्ये उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरचे काम सुरू आहे. औंध-रावेत बीआरटी मार्गावर जगताप चौकातून पिंपळे सौदागरला जाणारा रस्ता येथील नगरसेवक नाना काटे यांच्या प्रयत्नांमुळे खुला करण्यात आला. साई चौकातील पुलाचे काम चालू असल्याने वाकडवरून पिंपळे सौदागरकडे येणार्या वाहनांना ड क्षेत्रीय कार्यालयापासून वळून साई चौकात यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.
वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या सदंर्भात प्राधिकरण व महापालिकेच्या अधिकार्यासोबत, तसेच वाहतूक विभागाशी नगरसेवक नाना काटे यांनी चर्चा केली होती. त्यासाठी बंद ठवलेला पिंपळे सौदागरकडील रस्ता नगरसेवक नाना काटे यांच्या प्रयत्नाने खुला करण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता हा रस्ता लवकरात लवकर खुला करण्याबाबत ते आग्रही होते. त्यामुळे महापालिकेने साई चौक येथून पिंपळे सौदागरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे पिंपळे सौदागर रहिवाशी समाधान व्यक्त करत आहेत.