साकरीच्या आयटी अभियंत्यांचा उष्माघाताने मृत्यूचा संशय

0

भुसावळ- तालुक्यातील साकरी येथील रहिवासी व भोरगांव लेवा पंचायतीचा सदस्य व पुणे येथे आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या अभय शरद फेगडे (25) या युवकाचा 4 रोजी दुपारी मृत्यू झाला. मित्राच्या लग्नानिमित्त तो शुक्रवारी पहाटेच पुण्याहून साकरीत आला. भुसावळ येथे लग्न लावल्यानंतर तो घरी परतला मात्र काही वेळातच त्याला उलटी झाल्याने त्याची प्रकृती खालावल्याने त्यास गोदावरीत हलवले असता त्याचा मृत्यू झाला. उष्माघाताने या युवकाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. शरद भोजराज फेगडे यांचा तो मुलगा होय. युवकाच्या अकाली निधनाने साकरी व परीसरात शोककळा पसरली.