साकरीत जुगाराचा डाव उधळला ; 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

भुसावळ- तालुक्यातील साकरी येथे जुगाराचा डाव रंगात आला असताना तालुका पोलिसांनी धाव टाकत सहा जुगार्‍यांसह तीन दुचाकी, तीन मोबाईल व 9 हजारांच्या रोकडसह 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकून कारवाई केली. पोलिस कर्मचारी विशाल सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नीळकंठ नेहेते, संदीप प्रकाश बोटे, विनोद सोनवणे, महेंद्र मोरे, सचिन फालक व चेतन फालक यांना रात्रीच अटक करून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात आणले. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. तपास सहायक फौजदार नजीर काझी पुढील करत आहे.