साकरीत 11 हजारांचा मद्यसाठा जप्त

0

भुसावळ- तालुक्यातील साकरी येथील शिवाजी सोपान साळुंके यांच्या घरातून देशी-विदेशी दारूच्या सुमारे 11 हजार 424 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याने गावात खळबळ उडाली. तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक गजानन करेवार, विठ्ठल फुसे, उमेश बारी, प्रेम सपकाळे, रीयाज काझी यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दारूच्या बाटल्यांसह डीफ्रीज जप्त केले.