भुसावळ- साकरीफाटा ते साकरी गावापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण तसेच साकरी ते मन्यारखेडा या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, पंचायत समिती सदस्य सुनील महाजन, मनिषा पाटील, साकरी सरपंच कांचन भोळे, उपसरपंच भानुदास बाविस्कर, माजी सभापती सोपान भारंबे, भास्कर भारंबे, छोटू फालक, प्रदीप भारंबे, किरण चोपडे, जितु चोपडे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुनीता सपकाळे, गोलु पाटील, वामन सपकाळे, भालचंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नारायण कोळी यांची उपस्थिती होती.