यावल– तालुक्यातील साकळी येथील मंदाबाई नथ्थुसिंग लोधी या महिलेचे आठ ग्रॅम वजनाचे आठ हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून लांबवले. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शेतात ही घटना घडली. याबाबत यावल पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.. मंदाबाई लोधी शेतात तूर काढण्याचे काम करीत असताना अज्ञात व्यक्तीने मागून येत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरुन नेले. पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे पुढील तपास करीत आहेत.