साकळीच्या शारदा माध्यमिक विद्यालयात बोगस शिक्षकांची भरती

0

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी उपटले माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांचे कान : तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश

भुसावळ- यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा माध्यमिक मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या बोगस भरतीबाबत रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती मात्र अधिकार्‍यांनी कारवाई करण्याऐवजी संस्था चालकांना वाचवण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. शिवाजी दिवेकर यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तीन दिवसात महाजन यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आंदोलनानंतरही दखल नाही -सूर्यवंशी
साकळी येथील शारदा विद्यामंदिराबाबत यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली मात्र प्रशासनाने दखल घेत नाही. काही दिवसांपूर्वी जळगाव येथे माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांसह मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची प्रतिमा जाळण्यात आली त्यानंतर धरणे आंदोलन झाले व रस्ता रोकोही करण्यात आला मात्र प्रशासन न नमल्याने पुन्हा 6 ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा इशार दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना तक्रारींच्या अनुषंगाने खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावल्याचे सूर्यवंशी म्हणाले. या शाळेत 1970 पासून झालेली भरती बोगस असल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला असून संबंधित संस्थेचे पदाधिकारी व महाजन हे समाजाचे असल्याने त्यांच्यात जवळीक असल्यानेच ते कारवाई करीत नसल्याचे सूर्यवंशी म्हणाले.

तक्रारीनंतर अधिकार्‍यांनी दिला खोटा अहवाल
दिवेकर यांनी बजावलेल्या नोटीशीनुसार सूर्यवंशी यांनी एक ते 13 मुद्द्यांवर लेखी तक्रार केली होती मात्र त्यांना देण्यात आलेला अहवाल हा बोगस असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. वरीष्ठांनी कार्यवाही करण्याबाबत बजावूनही महाजन यांनी दखल घेतली नसल्याचे नोटीशीत नमूद आहे शिवाय त्यांनी वरीष्ठांच्या आदेशाची अवमानना करीत कार्यालयीन शिस्तीचाही भ ंग कला आहे. आपल्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? असेदेखील नोटीसीत बजावण्यात आले आहे. तीन दिवसात खुलासा न दिल्यास आपले काहीएक म्हणे नाही, असे समून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे नोटीसीत नमूद आहे.

कमेटीचा अहवाल अद्याप बाकी -देविदास महाजन
राजू सूर्यवंशी यांनी केलेल्या तक्रारीनंतर गटशिक्षणाधिकार्‍यांना चौकशीसाठ आदेश दिले होते शिवाय संस्थेला त्रृटींसाठी पत्र देण्यात आले मात्र अद्याप त्यांचा खुलासा आलेला नाही. चौकशीसाठी कमेटी स्थापन करण्यात आली असून त्यांचाही अहवाल अद्याप बाकी असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन म्हणाले.