साकळीतील ‘प्रवासी सेवा’ सामाजिक उपक्रमाचे यावल तहसीदारांकडून कौतुक

0

यावल : जगभरात कोरोनाचा हाहाकार असताना सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने देशभरातील प्रवासी मजूर वर्ग हा आपल्या गावी परतत आहे. अनेक जण तर पायदळ चालत आपले घर गाठण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे शासनाने परप्रातीयांना राज्याच्या सीमेवर सोडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी राज्य महामार्गावर तसेच जिथं शक्य होईल तिथ देशभरात प्रवासींना मानवतेच्या भावनेतून मदत केली जात आहे. याच अनुषंगाने साकळी,, ता.यावल येथील काही युवकांनी स्व-खर्चातून व तसेच काही पदाधिकार्‍यांची मदत घेऊन रस्त्यावरील प्रवासी वर्गाला नाष्टा तसेच पिण्याच्या पाण्याची व जेवणाची सोय करत प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करीत या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सेवाकार्य गावातील तरुण मंडळी करत आहेत.

प्रवासी सेवेचे सर्वत्र कौतुक
तीन राज्यांना जोडणार्‍या बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील साकळी गाव बस स्थाकन परीसरात गावातील काही लहान मुले, तरुण वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी या सर्व समाज घटकांकडून शक्य त्या प्रमाणात प्रवासी सेवा केली जात आहे. यात थंड पिण्याच्या पाण्याची सोय गावातील ‘आई ’ अक्वाचे मालक व चालक सामाजिक कार्यकर्ते बापू साळुंके व रवींद्र निळे यांच्याकडून अविरतपणे केली जात आहे. तसेच जेवणाची व्यवस्था गावातील सरपंच पती तसेच सुयोग हॉटेलचे मालक विलास (नाना) पाटील व शिक्षक सौरभ जैन यांच्याकडून करण्यात आली तर बिस्कीट पुडे तरुणांकडून स्वखर्चातून वाटप केले जात आहे. या मार्गावरून दिवसभरात महाराष्ट्राच्या सीमेवर जाण्यासाठी असंख्य वाहने जात आहेत. त्यांना प्रत्येक वेळी सोशल डीस्टसिंग पाळून जेवणाची व पाण्याची मदत केली जात आहे. सेवा देणारा प्रत्येक जण तोंडाला मास्क लावून व हात स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करून मदत करत आहे. ग्रामस्थांच्या या सेवा कार्याचे प्रवासी वर्गाकडून तोंड भरून कौतुक केले जात आहे आणि अशी दुर्दैवी परीस्थिती कोणावरही येऊ नये असा भावनिक सूर त्यांच्याकडून निघत आहेत. खरच कोरोनाने सर्व जाती धर्मांना तोडून माणुसकीची भिंत उभी केली असून सर्वांना जीवाची काळजी वाटत आहे.

तहसीलदार यांची भेट
यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर हे 16 रोजी संध्याकाळच्या दरम्यान बर्‍हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरून यावलकडे जात असताना त्यांना प्रवासी सेवा कार्याची माहिती झाल्याने त्यांनी उपक्रम राबवणार्‍या ग्रामस्थांची भेट घेतली व मार्गदर्शन केले. आज आपल्या या सेवा कार्याची समाजाला गरज असून आपल्या सेवा कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परंतु हे काम करीत असतांना स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सुरक्षित अंतर ठेवा व सुरक्षित रहा, असे तहसीलदार कुंवर सांगितले. यावेळी त्यांनी सेवा कार्यात सहभागी असणार्‍या दहा वर्षाच्या लहान मुलाचे कौतुक करून भविष्यात अशाच मुलांची देशाला गरज असल्याचे सांगितले.

यांचा होता सहभाग-
जळगाव जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते जनार्धन (बापू) साळुंके, शिक्षक सौरभ जैन, जितेंद्र वाघळे, पत्रकार मनु निळे, गणेश खेवलकर, निलेश चित्रे, सोमनाथ नेवे, विनायक सोनार, रोशन बारी, कृष्णा पाटील, नारायण मराठे, भूषण माळी, प्रकाश चौधरी, गणेश महेश्री, कल्पेश सोनार, संजय सोनार, कुंदन वानखेडे, अश्विन नेवे, मयूर बारी, भावसु बारेला यांचेसह विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.