यावल : तालुक्यातील साकळी येथील आंबेडकर नगरात अवैधरीत्या होणरी दारू विक्री बंद करावी, अशी मागणीचे निवेदन गुरूवारी यावल पोलिसांना देण्यात आले. गावातील बौद्ध पंच मंडळाच्या देण्यात आलेल्या निवेदनावर तब्बल 52 महिला व पुरुषांच्या स्वाक्षर्या आहेत. लॉकडाऊन असतांना देखील अशा प्रकारे होणारी अवैध दारू विक्री मुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो तेव्हा संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
साकळीत अवैध दारू विक्री
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. अशा मध्ये गोरगरिबांना समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. असे असतांना तालुक्यातील साकळी येथील आंबेडकर नगर भागांमध्ये काहीजण अवैधरित्या देशी-विदेशी दारूची खुले आम विक्री करतांना दिसत आहे. तेव्हा अनेक जण या भागात दारू पिण्या करीता गर्दी करीत आहेत. खुलेआम होणारी ही अवैद्य दारू विक्री पोलिसांच्या नजरेआड देखील नाहीये, असा आरोप करीत साकळी गावातील बौद्ध पंच मंडळीच्या पदाधिकार्यांनी निवेदन दिले आहे. पोलिस निरीक्षकांनी गावातील अवैद्य दारू विक्री बंद करावी व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन गुरूवारी बौध्द पंच मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जंजाळे, शरद बिर्हाडे, विजय जंजाळे, नाना भालेराव, राजू सोनवणे, राजेंद्र जंजाळे, मंगल जंजाळे, बबन बागुल, संजय वाघ, शंकर जंजाळे, संतोष जंजाळे, नाना जंजाळे, विजय जंजाळे सह गावातील महिला व पुरुषांनी यावल पोलिसांना दिले आहे.