साकळीत अशीही खबरदारी ! सार्वजनिक बसण्याच्या जागेला फासले काळे

0

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साकळी ग्रामपंचायतीकडून खबदारीच्या उपाययोजना

यावल : तालुक्यातील साकळी येथे संचारबंदीनंतरही मुख्य चौकात ग्रामस्थांची मोठी गर्दी होत होती म्हणून साकळी ग्रामपंचायतीकडून विविध स्तरावर खबरदारीच्या उपाययोजना तातडीने राबवल्या जता आहेत. .26 रोजी जि.प.चे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी साकळी येथे ग्रामपंचायत भेट दिली व कोरोनाबाबत कोणत्या उपाययोजना केल्या जात आहे याची सविस्तरपणे माहिती घेतली. पोलिस प्रशासनातर्फे गावात चौक भागात गर्दी करणार्‍यांना काठीचा चांगलाच ‘प्रसाद’ मिळत असल्याने नागरीकांच्या गर्दीवर कंट्रोल ठेवले जात आहे. दरम्यान, सार्वजनिक जागी गर्दी करणारे बसत असलेल्या बाकांवर काळे फासण्यात आल्याने गर्दीला आता आपसुकच आळा बसला आहे.

साकळीत सर्वोतोपरी खबरदारी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साकळी ग्रामपंचायतीकडून सरपंच सुषमा पाटील, उपसरपंच वसीम खान, सर्व ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी डी.आर.निकुंभ, तलाठी वानखेडे या सर्वांच्या एकत्रीत अश्या नियोजनातून कर्मचार्‍यांच्या मदतीने विविध प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना तातडीने राबवीत आहे. यात संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषधाची फवारणी करण्यात येत आहे तर गावात टप्प्याटप्प्याने गटारांची साफसफाई सुद्धा करण्यात येत आहे. त्यात माने गावातील मुख्य चौकात भाजी विक्रेत्यांची दुकाने लावल्यामुळे मोठी गर्दी होत होती या गर्दीवर आळा बसण्यासाठी भवानीदेवीच्या परिसरात फक्त चार भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्याची परवानगी दिलेली आहे. तसेच भाजी विक्रेत्यांना तसेच किराणा दुकानदारांना प्रत्येकी तीन फुटाच्या अंतराने पांढर्‍या रंगाने ग्राहकांना उभे राहण्यासाठी रकाने करण्याच्या तसेच इतरही काही महत्वाच्या सुचना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे.

युवकाची अशीही सजगतेतून ‘देशसेवा’ !
गावातील विविध अश्या व्यापारी संकुलाच्या ओट्यावर सकाळ व संध्याकाळ च्या वेळी अनेक ग्रामस्थ बसत असल्याने कोरोना आजाराची गंभीरचा लक्षात घेता इंदिरानगर प्लॉट भागातील रहिवाशी असलेला युवक हर्षल बाविस्कर या युवकाने ओट्यांवर व त्या परीसरातील बसण्याच्या जागेवर काळया रंगाचे खराब ऑईल टाकून गर्दीने बसणार्‍या नागरीकांच्या बैठकीवर खरोखर आळा घातलेला आहे. या युवकाने सध्याच्या आपत्कालीन परीस्थितीत आपल्या बौद्धिकतेने व सजगतेने केलेले काम खरोखर देशसेवे एवढेच मोठे आहे.तसेच बाविस्कर याने ग्रामपंचायतीकडे याप्रकारे परीसरातील अजून काही सार्वजनिक ओट्यांवर काळे ऑइल टाकण्याची मागणी केलेली आहे.

थ्गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून ‘प्रसाद’
कोरोना विषाणूमुळे आजार पसरू नये या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कलम 144 अंतर्गत संचारबंदीचा कायदा लागू करण्यात आलेला आहे. तसेच प्रशासनाकडून सुद्धा ‘घरातच रहा’ असे वारंवार सांगितले जात असतांना सुद्धा साकळीच्या मुख्य चौक व गल्लीबोळात नागरीकांची मोठी गर्दी होतांना दिसली तर पोलीस दादांकडून त्यांच्या काठीने चांगलाच ‘प्रसाद’ दिला जात आहे. त्यामुळे गर्दीवर कंट्रोल ठेवला जात आहे. तथापि नागरीकांनी सुद्धा परीस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे.
थ् बेंग्लोरहून आलेल्या नागरीकांची तपासणी-गावातील भवानीदेवी मंदिर परिसरातील रहिवासी असलेले व कामासाठी गेलेले काही बेलदार समाजाचे नागरिक आपल्या कुटुंबासह बेंगलोर (कर्नाटक) येथून 25 रोजी कोरोना आजाराच्या धास्तीने सायंकाळच्या दरम्यान साकळी येथे पोहचले. परंतु याच भागातील इतर रहिवाशी नागरिकांनी त्या बाहेरगावाहून आलेल्या नागरीकांना आरोग्य तपासणी करूनच म्हटल्यानंतर या ठिकाणी काही काळ गोंधळही झाला. दरम्यान पोलीस प्रशासन व जि.प.चे आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्या मदतीने या नागरिकांची यावल ग्रामीण रुग्णालयात पाठहून तपासणी करून घेतली.