यावल : यावल पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे साकळीत सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर धाड टाकत 15 जुगारींना गजाआड केले. संशयीतांकडून 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मंगळवारी सायंकाळी झालेल्या कारवाईने गावात मोठी खळबळ उडाली. साकळीत सार्वजनिक ठिकाणी जुगार अड्डा चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
या जुगारींना केली अटक
सहा.फौजदार मुजफ्फर खान, सुशील घुगे, राजेश वाडे यांच्या पथकाने जुगार खेळणार्या खालिक शेख, अहमद शाह, अनिल चौधरी, लतीफ तडवी, अल्लाउद्दीन शेख, असलम खान, चंद्रकांत जंजाळे, सरफराज तडवी, सुपडू तडवी, शेख अशपाक, किशोर खेवलकर, जाबीर शेख, जुम्माह तडवी, जाबीर तडवी व शेख जाकीर अशा पंधरा जणांना जुगार खेळतांना पकडले. कारवाईदरम्यान बबन पाटील (मनवेल) हा संशयीत पसार झाला. 15 संशयीताकडून 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत सर्वांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास संजय देवरे करीत आहे.