यावल : तालुक्यातील साकळी येथे जुन्या भांडणाच्या रागातुन दोन गटात वाद झाला. यात एका गटातील 45 वर्षीय महिलेचा तर दुसर्या गटातील 30 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही गटातील 12 जणांवर विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी घडली.
11 जणांविरुद्ध गुन्हा
साकळी, ता.यावल येथील पीडीत 45 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार ग्रामपंचायत निवडणूक वेळीच्या पुर्वीच्या भांडणाच्या रागातुन गावातील संशयीत आरोपी मिलिंद साहेबराव जंजाळे, अशोक श्रावण जंजाळे, शंकर अशोक जंजाळे, विजय हरी जंजाळे, विजय प्रल्हाद जंजाळे, विलास भिला सोनवणे, विशाल प्रकाश बाविस्कर, अरुणाबाई अशोक जंजाळे, रेखा प्रकाश बाविस्कर, देवानंद जगन जंजाळे व नाना सुर्यभान जंजाळे सह इतर काही अज्ञातांनी सोमवारी दुपारी पिडीताच्या घरात हातात लाठ्या-काठ्या घेवुन शिवीगाळ करीत दाखल झाले व पिडितास मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन मारहाण करीत अश्लिल शिवीगाळ केली. या वरील 11 जणांविरूध्द विनयभंगासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे.
विनयभंग व मारहाणीचा गुन्हा
याच भांडणाच्या कारणावरून 30 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादी नुसार गावातील संशयीत आरोपी मनोज श्रावण बिर्हाडे हा सोमवारी दुपारी महिलेकडे शारीरीक सुखाच्या मागणीचा आरोप असून त्यास विरोध दिल्यानंतर पतीस सांगितले असता पतीने जाब विचारला असता त्याच धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आल्यानंतर संशयीत बिर्हाडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.