दोन गटाच्या 48 संशयीतांविरुद्ध दंगलीचे गुन्हे ; 17 आरोपींना पोलिसांकडून अटक ; 31 पसार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध
यावल- प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत दोन गट समोरा-समोर भिडल्यानंतर गावात दंगल उसळली होती तर दोन्ही गटांनी सर्रास केलेल्या दगडफेकीत चारचाकीसह दुचाकीचे नुकसान होवून महिला व तरुण जखमी झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारीवरून 48 संशयीत आरोपींविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गावातील तणावाची स्थिती पाहता सोमवारच्या यात्रोत्सवासह सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गावात स्मशान शांतता असून गावाची शांतता भंग करणार्या दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे. गावात पोलिस बंदोबस्तासह दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
ग्रामसभेत पडली वादाची ठिणगी
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा सुरू असताना साकळी ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामपंचायतीचे नाव उर्दूत टाकावे तसेच डॉ.अब्दुल कलाम व टिपू सुलतान या महापुरूषांचे छायाचित्रे ग्रामपंचायत कार्यालयात लावावे, अशी मागणी एका गटाने केली व त्यास काही ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केल्यानंतर वादाची ठिणगी पडली. ग्रामसभेतचं दोन गट भिडल्याने ग्रामसभा उधळली जाणूवन समाजकंटकांनी थेट ग्रामपंचायतीवर दगडफेक केली तर या घटनेचे लोण संपूर्ण गावात पसरले. जमावाने तेथून ग्रामपंचायतीच्या मागे अक्सा नगरात मोर्चा वळवला व तेथे गोपाल सुभाष चौधरी यांचे चारचाकी वाहना (एम.एच.02 जे.पी.9788) च्या काचा फोडल्या. यावलचे पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, उपनिरीक्षक दीपक ढोमणे हे पथकासह दाखल झाले व त्यांनी शांतता प्रस्थापीत केली. अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह मोठा फौजफाटाही दाखल झाला.
दोन स्वतंत्र तक्रारीवरुन गुन्हा दाखल
पोलिस कर्मचारी सुशील घुगे यांच्या फिर्यादीनुसार शासकिय कामात आडथळा निर्माण करीत लोकांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दंगल पसरवणे आदी कलमान्वये 34 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यातील 17 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच गावातील जखमी फिर्यादी वैभव रवींद्र महाजन यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी दुपारी ते त्यांच्या आई अंजुबाई रवींद्र महाजन यांना रुग्णालयात औषधोपचार करून कुरेशी वाड्यातुन घरी जात असतांना त्यांना पाहून महिला व पुरूषांनी जातीवाचक शिविगाळ केली. तेव्हा शिव्या का देत आहेत? अशी विचारणा केली असता दोघांना हॉकीस्टीक व लोखंडी रॉडने मारहाण करीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी 14 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गावात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक सजनशाहवली (रहे.)यांच्या उरूस निमित्त रविवारी चौथी यात्रा होती व मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र गावातील तणावाचे वातावरण पाहता यात्रोत्सवासह नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
दंगलीप्रकरणी 17 आरोपींना अटक
साकळी दंगलप्रकरणी आसीफ खान, कासीम खान, अख्तर शेख, मोमीन तडवी, शेख शोएब, शेख इरफान, शेख अजगर, शाहिद खान, शेख तनवीर, शेख मोहसिन, शेख रफीक, ताहेर खान, शेख अन्सार, शाहबाज खान, शेख रज्जाक, शेख अब्दुल, इम्रान खान या 17 जणांना शनिवारी मध्यरात्री नंतर व पहाटे पुर्वी अटक करण्यात आली. आरोपींना यावल न्यायालयात हजर केले असता न्या.वि.भा.धुर्वे यांनी 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
31 संशयीतांचा कसून शोध
दंगलीतील वसीम खान, अशपाक शेख, रईस खान कुरेशी, शेख तौसिफ, तौसिफ मिस्तरी, मतीन कुरेशी, सादीक कुरेशी, मोहंमद बेकरीवाला, नुर शेख खालीद, समीर खाटीक, सद्दाम पिंजारी, असलम पिंजारी, नुर मन्यार, शकील खान, शेख शाहरूख मन्यार, सैय्यद अकरम, गोलू उर्फ संतोष कोळी सह 15 ते 20 संशयीतांसह दुसर्या गुन्ह्यातील आसीफ शेख, तौसीफ खान, शेख मोयुद्यीन, शेेख अय्युब, शेख इम्रान, कनीसबी जाफर, गुड्डी, फक्कु कुरेशी, रीझवान खान, रईसखान कुरेशी, सईद कुरेशी, हाफीस खान, कालु खान, रईस खान असे एकूण 31 संशयीत पसार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.