यावल : तालुक्यातील साकळी येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समीतीने गावात बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांचे सर्वेक्षण करून जनजागृती करताना आधळुन आलेल्या ग्रामस्थांना क्काँरटाईन होमचे शिक्के मारणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडुन सागण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सागर पाटील व डॉ
स्वाती कवडीवाले यांच्याकडुन कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सज्य असुन बाहेरून आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
गावात ग्रामस्तरीय समितीची स्थापना
साकळी येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समीतीमधील पदाधिकारी दररोज बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांना साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राला जाऊन तपासणी करण्यात करीत आहे. येथील ग्रामसेवक डी.आर निकुंभ, तलाठी व्ही.एस.वानखेडे, कोतवाल गणेश महाजन, आरोग्य सेवक सलाउद्दीन शेख, सेविका मालती चौधर, यांनी गावात घरोघरी जाऊन ‘क्काँरटाईन होम’ हा शिक्का बाहेरून आलेल्या नागरीकांच्या डाव्या हातावर मारुन घराबाहेर जाऊ नये, असा सल्ला देत आहे.
येथील 175 नागरीकांची नोंद करण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले यांच्याकडून सांगण्यात आले.