यावल- तालुक्यातील साकळी येथील 33 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मनोहर भिला पाटील (रा.माधवनगर, यावल) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे 17 मार्च 2017 रोजीदेखील याच महिलेचा आरोपीने विनयभंग केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. गुरूवारी दुपारी साकळी येथील पीडीत महिला बसस्थानकावर असताना आरोपीने विनयभंग केल्याचा आरोप आहे. तपास हवालदार युनूस तडवी करत आहे.