यावल : तालुक्यातील साकळी येथे केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत दुकान नं.35 व 36 या दोन स्वस्त धान्य दुकानात शनिवारी लाभार्थींना मोफत तांदूळ वाटप करण्यास सुरुवात आली. प्रति लाभार्थी व्यक्तीस पाच किलो प्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यांची होती उपस्थिती
साकळीचे समिती सदस्य सरपंच ग्रामविकास अधिकारी डी.आर.निकुंभ तसेच तलाठी व्ही.एस.वानखेडे, कोतवाल गणेश माळी, ग्रामपंचायतीचे वरीष्ठ लिपिक पंढरीनाथ माळी, कनिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली, लिलाधर मोरे, कर्मचारी उपस्थित होते. या वाटप दरम्यान सोशल डिस्टन्टचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मोफत तांदूळ वाटप झाल्याने लाभार्थींमधून समाधान व्यक्त करण्यात आले.