सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाची कारवाई
यावल– तालुक्यातील साकळी येथील अवैध दारू विके्रता निंबा तुळशिराम पाटील याच्या निवासस्थानी दारूचा मोठा अवैध मद्यसाठा असल्याची गुप्त माहिती भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाल्यानंतर पथकाने बुधवारी रात्री टाकलेल्या धाडीत एक लाख तीन हजार 846 रुपये किमतीच्या 18 प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली. आरोपी निंबा पाटील यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
साकळीकरांनी केले कारवाईचे स्वागत
बुधवारी रात्री आठ वाजता पोलिसांनी छापा टाकला तेव्हा हाकेच्या अंतरावर यावल पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी व सहकार्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची सभा सुरू होती. साकळीत प्रथमच अशा पद्धत्तीने कारवाई झाल्याने या कारवाईचे साकळीकरांनी स्वागत केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचे नीलोत्पल म्हणाले.
यांनी केली कारवाई
भुसावळ नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस. पावरा, सुनील जमदाळे, नबी शेख, रवींद्र चौधरी, निलेश पाटील, निलेश बच्छाव, हितेंद्र अहिरकर, श्याम पाटील, मनोज म्हस्के, चंद्रकांत पाटील, हेमंत पाटील, प्रवीण पाटील, किरण पाटील, शुभम बाविस्कर, अतुल गाडीलोहार, रवींद्र पाटील, राकेश बिर्हाडे, हर्षल पाटील, असमत अली सैय्यद, वैशाली बावीस्कर, दीपिका गवई आदींनी ही कारवाई केली.