यावल : तालुक्यातील साकळी येथील वाडेश्वर मंदिरास संरक्षण भित उभारण्याच्या कामाला नुकतीच सुरूवात झाली. या कामासाठी निधी जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील (छोटु भाऊ) यांच्या प्रयत्नातुन उपलब्ध करण्यात आला.
संरक्षण भिंतीच्या कामाला सुरूवात
साकळी, ता.यावल येथील जागृत देवस्थान श्री वाडेश्वर महादेव मंदिर असून या मंदिरास संरक्षण भिंत बांधण्यासाठी भाविक व नागरीकांची मागणी होती. या कामासाठी जिल्हा परीषदेतून निधी उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा परीषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी पुढाकार घेतला व त्यांच्या प्रयत्नातून संरक्षण भिंतीचे काम मंजूर करण्यात आले. संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन विश्व हिंदू परीषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते धोंडू आण्णा माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रवींद्र सूर्यभान पाटील (छोटुभाऊ) सह पंचायत समिती गटनेते दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर, दिनकर माळी, नितीन फन्नाटे, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष योगेश खेवलकर आदींची उपस्थिती होती. मंदिर परीसरात संरक्षक भिंतीचे काम मंजूर केल्याबद्दल सभापती रवींद्र पाटील यांचे ग्रामस्थानी आभार मानले.