साकळीत शेतमजुराची गळफास घेवून आत्महत्या

0

यावल- तालुक्यातील साकळी येथील शेतमजूर डिगंबर भिका मराठे (47) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. मराठे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. याबाबत यावल पोलिसात मयताचा मोठा भाऊ नामदेव मराठे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या डिगंबर मराठे यांनी मंगळवारी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली मात्र पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मयताच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई, भाऊ असा परीवार आहे.