साकळीत सरपंचपदासाठी चुरस वाढली

0

साकळी । ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगुल वाजला असून येत्या 26 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत साकळीच्या इतिहासातील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच निवडल्या जाणार असल्यानेही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिला या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गावाच्या पारावर रंगू लागल्या गप्पा
महिनाभर निवडणुकीला अवकाश असला असलातरी गावाच्या पारावर निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. राजकीय धुरिणांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 17 सदस्य असलेल्या साकळीची ग्रामपंचायत यावल तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत गणली जाते. सामाजिक व पक्षीय संबंधातून मतदानाचे ’गणित’ आखून निवडणुकीच्या आखाड्यात महिला उतरतील, असे राजकीय विश्‍लेषकांत वाटते.

निवडणुकीकडे तालुक्याचे लागले लक्ष
सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने गावातील अजून काही महिला उमेदवारी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागणार असून प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला लागेल हेही तितकेच खरे !