यावल- तालुक्यातील साकळी येथील सर सैय्यद एज्युकेशन सोसायटी संस्था व उर्दू हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 27 रोजी ‘एक शाम शहिदो के नाम’ मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे. या मुशायरा व कवी संमेलनात सब टिव्हीफेम हास्यकवी सुंदर मालेगावीसह सुप्रसिद्ध कवींची उपस्थिती असणार आहे. उद्घाटन ईकरा एज्युकेशन सोसायटी जळगावचे अध्यक्ष डॉ. अब्दुल कलीम सालार करतील. दीपप्रज्वालन राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अल्हाज अ.गफ्फार मलिक, फैजपूर पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, मोहम्मद हुसेन उर्फ अमीर साहेब यांच्या हस्ते होईल. या मुशायरा व कवी संमेलनाचे इकबाल साहिल अमरावती हे सूत्रसंचलन करतील. उर्दू हायस्कुलच्या नवीन इमारतीत होणार्या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.