साकळी गावात झाला आर्दश विवाह पिंजारी कुटुंबाच्या साखरपुडयासाठी वर मंडळी आली व जुन्या रूढींना फाटा देत लग्न लावुन गेलीत
यावल ( प्रतिनिधी ) सद्यस्थितीत सगळी कडे लग्न समारंभ म्हटले म्हणजे बजेजाव करण्याच्या नादात हौस मजा करण्यासाठी महागड डिजे किंवा वाजंत्री घोडा ,थाटमाट महागळी जेवणवळी सोबत मानपान, रूसवे फुगवे येतात अशा अनन्यसाधारण रूडी परंपरेच्या नांवाखाली होणारी लाखो रुपये अनाठायी खर्च होतात , तालुक्यातील साकळी गावातील पिंजारी कुटुंबात घडुन आला जुन्या रुडी पंरमपरेस झुगारून एक आर्दश विवाह घडवुन आला आहे . यावल तालुक्यातील साकळी गावात राहणारे अन्वर गुलाम पिंजारी यांची रोजमीन बानो कन्येच्या साखरपुडयास जळगाव येथील तांबापुर परिसरात राहणारे जाहिद ईस्माईल पिंजारी यांचा मुलगा फैजल पिंजारी यांच्याशी दिनांक २० ऑगस्ट रोजी होणार होते . दोघ ही मंडळी कडील पाव्हणी मंडळी साखरपुडयाच्या कार्यक्रमास उपस्थित झाली. दोघ नियोजीत वधु आणी वरच्या मंडळीतील जेष्ठ समाज बांधव आणी साकळीचे सामाजीक कार्यकर्ते यांच्या गप्पा गोष्टी व चर्चेतुन जुन्या परंपरेला फाटा देवुन साखरपुडयातच लग्न का लावु नये असा प्रस्ताव वर पक्षाकडुन आला मग काम नेक काम मे देरी क्यूं असे म्हणत पिंजारी कुटुंबातील दोघ कडील मंडळींनी सर्व लग्न लावुन घेतले यालाच म्हणता साखरपुडयास आले व लग्न लावुन गेले . साखरपुडयातच विवाह सोहळा अगदी साद्या पध्दतीने पार पडल्यामुळे सर्वांचे चेहरे आनंदा फुलुन गेले. साखरपुडयाचा कार्यक्रम विवाह सोहळ्यात परिवर्तीत करण्यासाठी साकळी गावातील समाजसेवक व उद्योगपती युनुस मंसुरी , रहीम राजु पिंजारी ( सर ) , कदीर पिंजारी भुसावल व आदी समाज बांधवांनी विशेष सहकार्य केले .