साकळी ग्रामपंचायतीत भाजपाला बहुमत

0

सरपंचपदी सुषमा पाटील विजयी

यावल: तालुक्यातील बहुचर्चित व लक्षवेधी असलेल्या साकळी ग्रामपंचायतीवर भाजपच्या सुषमा विलास पाटील दोन हजार 861 मतांनी विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी काँग्रेस गटाच्या सुनीता सचिन चौधरी यांचा तब्बल 685 मतांनी त्यांनी पराभव केला. चौधरी यांना दोन हजार 176 मते पडली. भाजप गटाचे 11 सदस्य तर काँग्रेस गटाचे सहा सदस्य येथे विजयी झाले.