यावल- तालुक्यातील साकळी येथे उसळलेल्या दंगलीनंतर आरोपींची धरपकड कायम असून शनिवारी एका संशयीताला अटक करण्यात आली तर अटकेतील 16 संशयीतांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर एका संशयीतास मात्र सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
16 संशयीतांना न्यायालयीन कोठडी
साकळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत काहींनी ग्रामपंचायती महापुरूषांचे फोटो लावण्यात यावे व ग्रामपंचायत कार्यालयावर उर्दूत नाव टाकण्याची मागणी केल्यानंतर वाद उफाळून त्याचे दंगलीत रूपांतर झाले होते. जमावाने चारचाकी वाहनांच्या काचा फोडत महिलांसह पुरूषांना मारहाण केली होती या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांद्वारे 48 संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांच्या वतीने फिर्याद झालेल्या गुन्ह्यात 17 जणांना अटक करण्यात आली होती तर त्यांची शनिवारी कोठडी संपल्याने न्यायालयाने 17 संशयीतांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर या संशयीतांमधील आसीफ खान हा दुसर्या गुन्ह्यातही पोलिसांना हवा असल्याने त्यास अटक करण्यात आली तर दुसर्या अन्य गुन्ह्यातील मोहंमद बेकरीवाला या संशयीतास शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर त्यास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. साकळीतील 16 संशयीत आरोपींची भुसावळ उपकारागृहात रवानगी करण्यात आली. अधिक तपास पोेलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, उपनिरीक्षक दीपक ढोमणे, हवालदार संजय तायडे करीत आहेत.