साकळी नूतन विकासोच्या चेअरमनपदी मोहन बडगुजर व्हा.चेअरमनपदी मराबाई तडवी बिनविरोध

यावल : तालुक्यातील साकळी गावातील नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मोहन काशीनाथ बडगुजर यांची तर व्हा.चेअरमनपदी मराबाई सर्फराज तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख तथा जळगाव जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील (छोटूभाऊ) व युवा नेते मोहसीन खान हाजी आसीफ खान यांच्या सूचनेवरून करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र गाढे होते. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा पॅनलच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख तथा जळगाव जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील (छोटूभाऊ) व युवा नेते मोहसीन खान हाजी आसीफ खान, यावल कृउबाचे माजी संचालक विलास नाना पाटील, शेतकरी विकास पॅनलचे नवनिर्वाचित संचालक अरुण रामचंद्र खेवलकर, सुनील बाबूलाल नेवे, निंबादास पंडित पाटील, आत्माराम चुडामण तेली, ईश्वर धोंडू कोळी, संचालिका लिलाबाई भगवान मराठे, आशाबाई रवींद्र बडगुजर, मावळते चेअरमन सूर्यभान बडगुजर, विलास काळे, सै.तैय्यब सै.ताहेर, दीपक पाटील, नबाव तडवी, नुतनराज बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर, खतीब तडवी, बिस्मिल्लाखा लालखा, परमानंद बडगुजर, संजय पाटील (गुरुजी), रामभाऊ खेवलकर, उमेशशेठ वाणी, राजु मराठे, नितीन फन्नाटे, विलास पवार, मंगल सोनार, किसन महाजन, दिलीप बडगुजर, गोटु बडगुजर, अरुण लोटु बडगुजर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी मी पॅनलप्रमुख, माझे सर्व सहकारी, सभासद बंधू-भगिनी या सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन मोहन बडगुजर म्हणाले.