साकळी येथे एका शेतमजुराची आत्महत्या

0

यावल- तालुक्यातील साकळी येथील अक्सा नगर भागातील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय शेत मजुराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नारसिंग सुरसिंग बारेला (45) असे मयताचे नाव आहे. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. बारेला हा हाजी आसीफ खान हाजी नुरखान यांच्याकडे शेतमजुरीचे कामे करीत होता. दरम्यान त्याची पत्नी जानु बारेला ही गेल्या काही दिवसापासून मुला-बाळांसोबत माहेरी गेली होती. कुटुंबातील व्यक्तीच्या सांगण्यानुसार पत्नी माहेरी गेली असल्यामुळे माझे कसे होणार ? सतत या विवंचनेत नारसिंग बारेला होता व त्याला नैराश्य आले होते. कुटुंब विस्कळीत झाल्याचास धसका घेऊन नारसिंग बारेला याने आपल्या राहत्या झोपडीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. 8 जुलै रोजी सायंकाळी पाच वाता मयताच्या बहिणीच्या लक्षात ही घटना आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुल, मुलगी, बहीण, दोन भाऊ असा परीवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.