यावल :- तालुक्यातील साकळी येथे दुचाकी व इंडीका कार समोरा-समोर धडकुन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. हा अपघात गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. यात एकाची प्रकृती गंभीर असुन त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
विजय प्रकाश महाले (वय ३५ रा. दुसखेडा, ता. यावल) हे दुचाकी वरून त्यांच्या पत्नी सपना विजय महाले (वय २८) व मुलगा चेतन विजय महाले (वय ८) यांच्यासह चोपड्या कडून यावल कडे येत होते दरम्यान सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास साकळी येथील बसस्थानका जवळील पुलावर यावलकडून चोपड्या कडे जाणारी इंडीका कार (क्रमांक एम. एच. १८ एस. १७२८) यांच्या थेट समोरा- समोर टक्कर झाली त्यात दुचाकीस्वार विजय महाले यांच्या डाव्यापायाचे हाउ मोडले तर त्यांच्या पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले. घटनेेची माहिती मिळताच १०८ रूग्णवाहिकेतील डॉ. उमेश कवडीवाले, अरूण कोळंबे, चंद्रकांत ढोके यांनी घटनास्थळ गाठले व जखमी वियज यास जिल्हा समान्य रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहेे तर इंडीका चालक अपघातानंतर वाहन सोडून पसार झाला.