चिंबळीः आळंदीकडे जाणार्या रस्त्यावर केळगांव हद्दीतील ओढ्यावर असलेल्या साकव पुलांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तिर्थक्षेत्र आळंदीकडे जाणार्या चिंबळी फाट्याला व केळगांव-आळंदी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यात खच्चून गेल्या आहेत. तर केळगांव येथील साकव पुलावर खड्डे पडले आहेत. पावसाळी हंगामात या साकव पुलावर पाणी साचतं असल्याने पायी चालणे व मोटार सायकल चालविणे मोठे धोक्याचे झाले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान व आषाढी वारी होणार आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी चिंबळी फाटा-केळगांव या रस्त्याचा वापर हजारो भाविक करीत असतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने खड्डे बुजून केळगांव येथील साकव पुलांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.