भुसावळ: भुसावळ-जळगाव मार्गावरील साकेगाव गावाजवळील वाघूर नदीच्या पुलावर 60 ते 65 वर्षीय अनोळखी इसमाने मफलरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयताच्या खिशात जळगाव-नाशिक व नाशिक जळगाव दरम्यानचे बस व रेल्वेचे तिकीट आढळले आहे. नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे व सहकार्यांनी धाव घेतली. मयताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही तर ओळख पटत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे.