दुसरा बळी : राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेने वाहनधारक संतप्त
भुसावळ: तालुक्यातील साकेगाव गावाजवळील पुलावर दोन भरधाव दुचाकी एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला. मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे येथील सदाशीव दामू कोळी (सपकाळे, 50) हे दुचाकी (एम.एच.19 ए.जी.3584) ने जात असताना समोरून येणारी लुना (एम.एच.19 बी.एल.4384) यांच्यात अपघात होवून लुनास्वार राम भरोत विश्वकर्मा (52, रा.भादली स्टेशन) हे गंभीर जखमी झाले तर दुचाकीस्वार सदाशीव कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश वैद्य, एएसआय रघुनाथ कळसकर, गजानन काळे, राजेंद्र पवार, रियाज शेख, अजय माळी यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
महामार्गाचा आठवड्यातील दुसरा बळी
राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुसरा बळी गेल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आतातरी नहीं च्या अधिकार्यांची झोप उघडणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.