भुसावळ : भुसावळ तालुका पोलिस पोलिसांनी गस्तीदरम्यान गावठी दारूची वाहतूक करताना दिनेश नाना नरवाडे व शंकर भगवान महाजन यांना रंगेहाथ पकडत त्यातून ताब्यातून दुचाकीसह 25 लीटर गावठी दारू जप्त केली. एकूण 28 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल शनिवारी मध्यरात्री झालेल्या कारवाईत जपत करण्यात आला. आरोपींविरूद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, भीमदास हिरे, हवालदार विठ्ठल फुसे, विजय पोहेकर, प्रदीप इंगळे, जगदीश भोई , होमगार्ड सेकोकारे आदींनी केली.