साकेगावनजीक भरधाव ट्रक समोरा-समोर धडकल्या ; दोघे चालक जखमी

2

भुसावळ– साकेगावजवळील कपूर पेट्रोल पंपाजवळ भरधाव दोन ट्रक समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. ट्रक (आर.जे.04 जीबी 2404) व ट्रक (एम.एच.19 झेड.5737) मध्ये धडक झाली. या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाले असून त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकांची नावे कळू शकली नाहीत.