साकेगावसह निंभोर्‍यातील जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- तालुक्यातील साकेगावसह निंभोरा येथे सट्टा, जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी धाड टाकत जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी तालुका पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या कारवाईत साकेगाव बसस्थानकाजवळ बारसू दशरथ कोळी हा कल्याण मटका खेळताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 50 रुपयांची रोकड जपत करण्यात आली. दुसरी कारवाई निंभोरा बु.॥ गावातील हॉटेल त्रिमूर्तीमागून प्रल्हाद उखा वाघ यास कल्याण मटका खेळताना अटक करण्या आली. आरोपीच्या ताब्यातून 960 रुपयांची रोकड व सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड, हवालदार सुपडा पाटील, चालक नाझीर काझी यांच्या पथकाने केली.