साकेगावात पाईप लाईन फुटली ; लाखो लिटर पाण्याची नासाडी

0

भुसावळ- तालुक्यातील साकेगाव पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकाराबाबत सोशल मिडीयावरून संबंधित यंत्रणेविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली. साकेगाव येथे तापी नदीच्या पात्रातून जळगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्‍या 0.7 मिटर व्यासाच्या पाईपलाइनचे कपलिंग सटकल्याने ही घटना घडल्याचे समजते. बुधवारी दुपारी 12.30 वाजता पंपींग बंद झाल्यानंतरही पाईपलाइनमधील पाण्याचे लोट सुरुच होते तर एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण प्रकल्पातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी जळगाव खुर्द व साकेगाव जवळील रीटर्न व्हॉल्व्ह बंद केल्यानंतर दुपारी एक वाजता पाण्याची नासाडी थांबवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

महामार्गावर पाणीच पाणी
साकेगाव तापी पात्रातून जळगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्‍या 700 मीमी व्यासाची पाईप लाईप गेली बसून बसस्थानकाजवळ दुपारी 12 वाजेच्या सुमारास महामार्गाचे साईडपट्ट्यांचे काम सुरू असताना 0.7 मीटर व्यासाच्या पाईपलाइनची कपलींग सटकल्याने लाखो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय झाला. सुमारे अर्धा तास पाणी वाहत असल्याने प्रमोद पाटील यांनी जळगाव एमआयडीसी प्रशासनाकडे संपर्क साधून पंपींग यंत्रणा बंद करण्याबबत कळवले.