साकेगावात 32 हजारांचा गुटखा जप्त : एकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे सुमारे 32 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पिंटू जगन भोई (23) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी साकेगाव येथे पिंटू पान सेंटर दुकान असून असून त्यात महाराष्ट्र शासनाची बंदी घातलेला विमल गुटखा व सुगंधी सुफपारी पानसुपारी मसाला असल्याची माहिती मिळाल्यावरून कारवाई करण्यात आली. आरोपीकडून 31 हजार 653 रुपये किंमतीचा गुटखा तसेच दुचाकी मिळून 66 हजार 653 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, अंमलदार विजय पोहेकर, संजय मोंढे, विठ्ठल फुसे, जगदीश भोई यांनी केली.