भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री चार ठिकाणी छापे मारत चार ठिकाणी देशी दारू आणि गावठी दारू असा 11 हजार 250 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांच्यासह विठ्ठल फुसे, विजय पोहेकर, जगदीश भाई यांच्यासह आरसीपी पथक, तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी अशा सुमारे 20 जणांच्या पथकाने शनिवारी रात्री सात वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली. चार ठिकाणाहून तालुका पोलिसांनी देशी आणि गावठी दारूचा साठा मिळून 11 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सतीश सावळे यांच्याकडे दोन हजार 496 रुपयांच्या देशी दारूच्या 48 बाटल्या मिळाल्यात. दुसर्या कारवाईत आंबेडकर नगरात मार्तंड सपकाळे यांच्याकडे देशी दारूच्या सुमारे तीन हजार 354 रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. सिंगार बर्डी भागात भिका कोळी यांच्याकडून 30 लिटर गावठी दारू सुमारे दोन हजार 700 रुपये किंमतीची तसेच रवींद्र कोळी यांच्याकडे सुद्धा 30 लिटर दारू दोन हजार 700 रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली.